व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार रक्‍तसंक्रमण का स्वीकारत नाहीत?

यहोवाचे साक्षीदार रक्‍तसंक्रमण का स्वीकारत नाहीत?

सर्वसामान्य गैरसमजुती

  असत्य: यहोवाच्या साक्षीदारांचा औषधांवर किंवा वैद्यकीय उपचारांवर विश्‍वास नाही.

 सत्य: यहोवाचे साक्षीदार त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चांगल्यातील चांगले वैद्यकीय उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा अशा कुशल डॉक्टरांकडे जातो जे आमच्यावर रक्‍ताविना वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया करू शकतात. आत्तापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीची आम्ही कदर करतो. खरेतर, यहोवाच्या साक्षीदारांच्या रक्‍ताविना होणाऱ्‍या उपचारांमुळे समाजातील इतरांनाही त्याचा फायदा झाला आहे. अनेक देशांमध्ये कोणताही रुग्ण रक्‍तसंक्रमणामुळे होणारे रक्‍ताशी संबंधित रोग, रोगप्रतिकारक शक्‍तीवर होणारे दुष्परिणाम आणि डॉक्टर्समुळे होणाऱ्‍या चुकांचा परिणाम टाळू शकतो.

 असत्य: विश्‍वासाने रुग्णांचा रोग बरा केला जाऊ शकतो असे यहोवाचे साक्षीदार मानतात.

 सत्य: असे आम्ही मानत नाही.

 असत्य: रक्‍तसंक्रमणाऐवजी पर्यायी उपचारपद्धती जास्त महागड्या आहेत.

 सत्य: उलट या पर्यायी उपचारपद्धती परवडण्यासारख्या आहेत. a

 असत्य: रक्‍तसंक्रमण न स्वीकारल्याने प्रत्येक वर्षी अनेक साक्षीदार व लहान मुले दगावतात.

 सत्य: हे वाक्य पूर्णपणे निराधार आहे. खरेतर हृदय शस्त्रक्रिया, संधीवातावरील शस्त्रक्रिया आणि अवयव ट्रान्सप्लान्ट अशा अनेक गुंतागुंतीच्या उपचारपद्धती सर्जन रक्‍तसंक्रमणाशिवाय अगदी कुशलतेने करतात. b रुग्ण, लहान मुले जे रक्‍तसंक्रमणाशिवाय उपचारपद्धती स्वीकारतात ते मुळात ज्यांनी रक्‍तसंक्रमणाचा उपयोग केला आहे त्यांच्यापेक्षाही लवकर बरे होतात. c पण एखादी व्यक्‍ती रक्‍त न स्वीकारल्याने मरू शकते किंवा रक्‍त स्वीकारल्याने जिवंत राहू शकते याची शाश्‍वती कोणीही देऊ शकत नाही.

यहोवाचे साक्षीदार रक्‍तसंक्रमण का स्वीकारत नाहीत?

 हा विषय वैद्यकीय पातळीवरचा नाही तर धार्मिक पातळीवरचा आहे. बायबलमधील जुन्या आणि नवीन करारात रक्‍त शरीरात घेण्याचा निषेध करण्यात आला आहे. (उत्पत्ति ९:४; लेवीय १७:१०; अनुवाद १२:२३; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) त्याचबरोबर, रक्‍त हेच जीवन आहे असा देवाचा दृष्टिकोन आहे. (लेवीय १७:१४) त्यामुळे आम्ही रक्‍त न स्वीकारण्याबाबत देवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करतो, पण त्याचबरोबर तो जीवनदाता आहे म्हणून त्याचा आदरही करतो.

डॉक्टर्सचा दृष्टिकोन बदलत आहे

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता रक्‍तसंक्रमणाशिवाय यशस्वी रीत्या केल्या जाऊ शकतात

 एके काळी, डॉक्टर्स असा विचार करायचे, की रक्‍तसंक्रमण न स्वीकारता पर्यायी औषधोपचार घेणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे. पण, अलीकडच्या वर्षांत डॉक्टरांचा दृष्टिकोन बदलला आहे. उदाहरणार्थ, मेडिकल एज्युकेशन जर्नलच्या २००४ मधील लेखात असे लिहिले होते: “यहोवाच्या साक्षीदारांसाठी ज्या रक्‍तविरहित उपचारपद्धती वापरण्यात आलेल्या आहेत त्या येणाऱ्‍या वर्षांत सर्वांसाठी वापरण्यात येतील.” d २०१० मध्ये हार्ट, लंग ॲन्ड सरक्युलेशन या मासिकातील एका लेखात असे लिहिले होते: “रक्‍तविरहित शस्त्रक्रिया करणे फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांपुरतीच मर्यादित असू नये, तर डॉक्टरांनी त्याचा वापर प्रत्येक रुग्णासाठी करावा.”

 जगातील हजारो डॉक्टर्स आता रक्‍त-जतन करून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रक्‍तसंक्रमणाशिवाय करतात. प्रगतिशील देशांतसुद्धा रक्‍तसंक्रमणाऐवजी पर्यायी उपचारपद्धतींचा वापर केला जात आहे आणि यहोवाचे साक्षीदार नसलेले लोकही या उपचारपद्धतींची मागणी करत आहेत.

a ट्रान्सफ्यूजन ॲन्ड अफेरेसिस सायन्स, खंड ३३, क्र. ३, पृ. ३४९ पाहा.

b दी जर्नल ऑफ थोरॅसिक ॲन्ड कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी, खंड १३४, क्र. २, पृ. २८७ ते २८८; टेक्सस हार्ट ईन्स्टिट्यूट जर्नल, खंड ३८, क्र. ५, पृ. ५६३; बेसिक्स ऑफ ब्लड मॅनेजमेंट, पृ. २; आणि कन्टीन्युइंग एज्युकेशन इन ॲनेस्थिशिया, क्रिटीकल केअर ॲन्ड पेन, खंड ४, क्र. २, पृ. ३९ पाहा.

c दी जर्नल ऑफ थोरॅसिक ॲन्ड कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी, खंड ८९, क्र. ६, पृ. ९१८; आणि हार्ट, लंग ॲन्ड सरक्युलेशन, खंड १९, पृ. ६५८

d कन्टीन्युइंग एज्युकेशन इन ॲनेस्थिशिया, क्रिटीकल केअर ॲन्ड पेन, खंड ४, क्र. २, पृ. ३९.