व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाचवी गोष्ट

मोठ्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं मूल्य

मोठ्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं मूल्य

मोठ्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनात काय सामील आहे?

मोठ्यांकडून मिळणारं मार्गदर्शन आणि सल्ला मुलांसाठी फायद्याचं असतं. पालक या नात्याने तुम्ही ती भूमिका चांगल्या रीतीने पार पाडू शकता. खरंतर ही जबाबदारी तुमचीच आहे. पण इतर प्रौढ व्यक्‍तीही मुलांना सल्ले देऊ शकतात किंवा मदत करू शकतात.

मोठ्यांकडून मार्गदर्शन मिळवणं महत्त्वाचं का आहे?

बऱ्‍याच देशांमध्ये मुलं मोठ्या लोकांसोबत कमी वेळ घालवतात. पुढे दिलेल्या काही गोष्टींवर विचार करा:

  • मुलं दिवसातला बराचसा वेळ शाळेत घालवतात जिथे विद्यार्थ्यांची संख्या शिक्षकांपेक्षा किंवा इतर प्रौढ व्यक्‍तींपेक्षा जास्त असते.

  • काही मुलं शाळा सुटल्यानंतर घरी येतात तेव्हा ते एकटेच असतात कारण आईवडील दोघंही कामावर गेलेले असतात.

  • एक रिपोर्ट दाखवतो की अमेरिकेमध्ये ८ ते १२ वयोगटातली मुलं दररोज टीव्ही बघण्यात, संगीत ऐकण्यात आणि व्हिडिओ गेम खेळण्यात सरासरी सहा तास घालवतात. *

होल्ड ऑन टू युवर किड्‌स  या पुस्तकात म्हटलं आहे: तरुण मुलं सल्ल्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी आईवडील, शिक्षक किंवा इतर जबाबदार प्रौढ व्यक्‍तींकडे जात नाहीत तर आपल्याच वयाच्या मुलांकडे जातात. तसंच, ते त्यांचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

मुलांना मार्गदर्शन कसं देता येईल?

आपल्या मुलांसोबत वेळ घालवा.

बायबल तत्त्व: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” —नीतिसूत्रे २२:६.

आईवडिलांनी मार्गदर्शन देऊन आपल्याला मदत करावी अशी सहसा मुलांची इच्छा असते. खरंतर, तज्ज्ञ सांगतात की मुलं जेव्हा किशोरवयात येतात तेव्हा त्यांना आपल्या वयाच्या मुलांकडून सल्ला घेण्यापेक्षा आपल्या आईवडिलांकडून सल्ला घ्यायला आवडतं. याबद्दल डॉक्टर लॉरन्स स्टीनबर्ग यु अॅन्ड यॉर अडॉलसेन्ट  या आपल्या पुस्तकात म्हणतात, “मुलांचा किशोरवयीन ते प्रौढ बनण्यापर्यंतचा जो काळ असतो त्यात त्यांच्या स्वभावात आणि मनोवृत्तीत बदल होत असतो आणि यादरम्यान आईवडिलांचा मुलांवर जास्त प्रभाव पडत असतो.” तसंच ते पुढे म्हणतात: “किशोरवयीन मुलं जरी तुमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत नसले तरीही तुमचे विचार काय आहेत हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि तुमचं ऐकतीलही.”

मुलांना तुमच्याकडून मार्गदर्शन घेण्याची आवड असल्यामुळे तुम्ही त्यांना मार्गदर्शन देण्याचा होता होईल तितका प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्ही काय विचार करता यांबद्दल त्यांना सांगा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही जीवनातून कोणता धडा शिकलात याबद्दलही त्यांना सांगा.

मुलांना एका अनुभवी व्यक्‍तीकडून शिकण्यासाठी मदत करा.

बायबल तत्त्व: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.

तुमच्या नजरेत अशी एखादी आदर्श प्रौढ व्यक्‍ती आहे का जिचं तुमचे किशोरवयीन मुलं अनुकरण करू शकतील? जर असेल तर त्या प्रौढ व्यक्‍तीसोबत वेळ घालवता यावा म्हणून तुम्ही तिच्याशी तुमच्या मुलांची भेट घालून देऊ शकता का? पण याचा असा अर्थ होत नाही की पालक म्हणून तुमची जबाबदारी तुम्ही त्या व्यक्‍तीवर सोपवली आहे. ती व्यक्‍ती भरवशालायक असल्यामुळे ती तुमच्या मुलांना नुकसान पोहोचवणार नाही, तर तुम्ही देत असलेल्या प्रशिक्षणला ती हातभारच लावेल. बायबलमध्ये उल्लेख केलेला तीमथ्य हा प्रौढ होता तरीही त्याने पौल नावाच्या व्यक्‍तीशी मैत्री केली आणि याचा त्याला फायदा झाला. तसंच, तीमथ्यसोबत मैत्री केल्यामुळे पौललाही फायदा झाला.—फिलिप्पैकर २:२०, २२.

आज बरीचशी कुटुंबं एकाच घरात किंवा जवळपास राहत नाहीत. अनेकदा आजी-आजोबा आणि इतर नातेवाईक दुसऱ्‍या देशांत राहतात. तुमच्याबाबतीत हे खरं असेल तर तुमच्या मुलांना अशा एका प्रौढ व्यक्‍तीसोबत वेळ घालवण्याची संधी द्या जिच्यात असे गुण असतील जे तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये पाहायला आवडतील.

^ परि. 9 त्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की किशोरवयीन मुलं दररोज सरासरी ९ तास मनोरंजनात घालवतात. या आकड्यांमध्ये, लहान मुलं आणि किशोरवयीन, अभ्यासासाठी इंटरनेटवर जो वेळ घालवतात त्याचा यात समावेश नाही.