व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २

आम्हाला यहोवाचे साक्षीदार का म्हणतात?

आम्हाला यहोवाचे साक्षीदार का म्हणतात?

नोहा

अब्राहाम आणि सारा

मोशे

येशू ख्रिस्त

बरेच लोक विचार करतात की यहोवाचे साक्षीदार हे एका नवीन धर्माचे नाव आहे. पण खरे पाहता २,७०० वर्षांपूर्वीच खऱ्या देवाच्या सेवकांचे वर्णन देवाचे “साक्षी” असे करण्यात आले होते. (यशया ४३:१०-१२) १९३१ पर्यंत आम्हाला बायबल विद्यार्थी या नावाने ओळखले जात होते. मग आम्ही यहोवाचे साक्षीदार हे नाव का धारण केले?

या नावाने आमच्या देवाची ओळख होते. प्राचीन हस्तलिखितांनुसार बायबलमध्ये देवाचे, यहोवा हे नाव हजारो वेळा आले आहे. बऱ्याच भाषांतरांमध्ये या नावाच्या जागी परमेश्वर, देव, प्रभू यांसारख्या उपाधींचा वापर करण्यात आला आहे. पण खऱ्या देवाने प्राचीन काळातील मोशेला, यहोवा किंवा काही बायबल भाषांतरांमध्ये याव्हे हे त्याचे वैयक्तिक नाव असल्याचे सांगितले व पुढे म्हटले: “हेच माझे सनातन नाव आहे.” (निर्गम ३:१५; १५:३) या प्रकारे सर्व खोट्या देवांपासून तो कसा वेगळा आहे हे त्याने दाखवले. देवाच्या या पवित्र नावाने ओळखल्या जाण्याचा आम्हाला गर्व आहे.

या नावामध्ये आमचे ध्येय गोवलेले आहे. प्राचीन काळातील विश्वासू हाबेलापासूनच्या देवाच्या सेवकांनी यहोवावर असलेल्या त्यांच्या विश्वासाची साक्ष दिली. त्यानंतरच्या बऱ्याच शतकांत नोहा, अब्राहाम, सारा, मोशे, दावीद आणि इतर अनेक लोकांची या ‘मोठ्या साक्षीरूपी मेघात’ भर पडली. (इब्री लोकांस ११:४–१२:१) ज्याप्रमाणे एक व्यक्ती न्यायालयात निर्दोष व्यक्तीच्या वतीने साक्ष देऊ शकते, त्याप्रमाणेच देवाविषयीचे सत्य लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा निर्धार आहे.

हे नाव धारण करून आम्ही येशूचे अनुकरण करतो. बायबल येशूला “विश्वसनीय व खरा साक्षी” असे म्हणते. (प्रकटीकरण ३:१४) येशूने स्वतः म्हटले की त्याने देवाचे “नाव कळवले” आणि तो देवाविषयीच्या “सत्याची साक्ष” देत राहिला. (योहान १७:२६; १८:३७) त्यामुळे येशूच्या खऱ्या अनुयायांनी यहोवाचे नाव धारण करणे आणि ते इतरांना सांगणे अत्यंत गरजेचे आहे. आणि यहोवाचे साक्षीदार हेच करत आहेत.

  • बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव का धारण केले?

  • पृथ्वीवर यहोवाची साक्ष देणारे कधीपासून आहेत?

  • यहोवाचा सर्वात महान साक्षीदार कोण आहे?