व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १

प्रभावी प्रस्तावना

प्रभावी प्रस्तावना

प्रेषितांची कार्ये १७:२२

सारांश: तुमच्या प्रस्तावनेमुळे श्रोत्यांमध्ये विषयाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे. तसंच, त्यावरून तुमचा मुख्य विषय आणि तो विषय श्रोत्यांसाठी का महत्त्वाचा आहे हे स्पष्ट झालं पाहिजे.

हे कसं कराल:

  • आवड निर्माण करा. श्रोत्यांची उत्सुकता वाढेल असा एखादा प्रश्‍न, वाक्य, सत्य घटना किंवा एखाद्या बातमीचा उल्लेख करा.

  • मुख्य विषय स्पष्ट करा. तुमच्या प्रस्तावनेतून तुमचा मुख्य विषय आणि तुमच्या सादरतेचा हेतू लोकांना स्पष्टपणे समजला पाहिजे.

  • विषय महत्त्वाचा का आहे ते दाखवा. लोकांच्या व्यावहारिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या प्रस्तावनेत फेरबदल करा. तुम्ही सांगत असलेल्या माहितीमुळे त्यांना वैयक्‍तिक रित्या कसा फायदा होईल, हे त्यांना स्पष्टपणे समजलं पाहिजे.