टेहळणी बुरूज क्र. २ २०२० | देवाचं राज्य नेमकं काय आहे?

लोक हा प्रश्‍न अनेक शतकांपासून विचारत आले आहेत. आणि बायबल याचं उत्तर देतं.

“तुझं राज्य येवो”—लाखो लोक दररोज करतात अशी प्रार्थना

या प्रार्थनेचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला देवाच्या राज्याबद्दल असलेल्या कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं माहीत असणं गरजेचं आहे?

आपल्याला देवाच्या राज्याची गरज का आहे?

माणूस माणसावर राज्य करत असेल तर समस्या या असणारच.

देवाच्या राज्याचा राजा कोण आहे?

देवाच्या राज्याचा राजा कोण असेल, हे ओळखण्यासाठी बायबलच्या अनेक लेखकांनी बरीच माहिती लिहून ठेवली आहे. संपूर्ण मानवी इतिहासात फक्‍त एकाच माणसाच्या बाबतीत त्या गोष्टी पूर्ण झाल्या.

देवाचं राज्य या पृथ्वीवर कधी येईल?

येशूच्या काही विश्‍वासू शिष्यांनासुद्धा या प्रश्‍नाचं उत्तर हवं होतं. मग त्याने त्यांना काय उत्तर दिलं?

देवाचं राज्य कोणकोणत्या गोष्टी करेल?

फक्‍त देवाचंच राज्य पृथ्वीवरच्या समस्या काढू शकतं हे येशूला माहीत होतं. त्या राज्याने अशा कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे आपला त्याच्यावरचा भरवसा वाढेल?

आत्ताच देवाच्या राज्याची बाजू घ्या!

आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा, असं प्रोत्साहन येशूने आपल्या शिष्यांना दिलं. तुम्ही हा प्रयत्न कसा करू शकता?

देवाचं राज्य—नेमकं काय आहे?

देवाचं राज्य यावं यासाठी आज बरेच लोक प्रार्थना करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की देवाचं राज्य म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्यासाठी काय करेल?