व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव राज्य करत होता तेव्हा सगळीकडे एकता आणि शांती होती

आपल्याला देवाच्या राज्याची गरज का आहे?

आपल्याला देवाच्या राज्याची गरज का आहे?

मानवी इतिहासाच्या सुरुवातीला आपला फक्‍त एकच शासक होता. तो म्हणजे आपला निर्माणकर्ता. त्याचं नाव यहोवा आहे. तो अगदी प्रेमळपणे मानवांवर राज्य करायचा. त्याने एदेन नावाच्या ठिकाणी एक सुंदर बाग बनवली आणि ती जागा त्यांना राहायला दिली. शिवाय, खाण्या-पिण्यासाठीही त्याने त्यांना भरपूर वस्तू दिल्या. यासोबतच त्याने त्यांना समाधान मिळेल असं काम दिलं. (उत्पत्ति १:२८, २९; २:८, १५) मानव जर देवाच्या प्रेमळ अधिकाराखाली राहिले असते, तर त्यांना नेहमी शांतीने राहता आलं असतं.

पहिल्या मानवी जोडप्याने देवाच्या अधिकाराखाली राहायचं नाकारलं

बायबलमध्ये एका बंडखोर देवदूताबद्दल सांगितलं आहे. पुढे त्याला दियाबल सैतान म्हणून ओळखण्यात आलं. त्याने असा दावा केला, की देवाला मानवांवर राज्य करण्याचा अधिकार नाही. त्यांना आनंदी राहण्यासाठी देवाच्या मार्गदर्शनाची आणि राज्याची काहीही गरज नाही, असं त्याला म्हणायचं होतं. दुःखाची गोष्ट म्हणजे पहिलं मानवी जोडपं, म्हणजेच आदाम आणि हव्वा, सैतानाप्रमाणे वागले आणि तेही देवाच्या विरोधात गेले.—उत्पत्ति ३:१-६; प्रकटीकरण १२:९.

आदाम आणि हव्वा यांनी देवाला शासक म्हणून नाकारल्यामुळे काय झालं? ते जिथे राहत होते ते सुंदर नंदनवन त्यांनी गमावलं. तसंच, निरोगी आणि कधीही न संपणारं जीवन जगण्याची संधीही ते गमावून बसले. (उत्पत्ति ३:१७-१९) त्यांच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्या मुलांवरही झाला. बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की आदामने पाप केल्यामुळे ‘पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं.’ (रोमकर ५:१२) आदाम आणि हव्वा यांनी केलेल्या पापामुळे आणखीन एक वाईट परिणाम झाला. तो म्हणजे, माणसाने माणसावर सत्ता चालवून त्याचं नुकसान केलं आहे. (उपदेशक ८:९) दुसऱ्‍या शब्दांत सांगायचं तर जोपर्यंत माणूस माणसावर राज्य करत राहील, तोपर्यंत समस्या येतच राहतील.

मानवी शासनाची सुरुवात

निम्रोदने यहोवाविरुद्ध बंड केलं

बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की निम्रोद हा पहिला मानवी शासक होता. आणि त्याने यहोवाच्या अधिकाराविरुद्ध बंड केलं. निम्रोदच्या काळापासूनच बऱ्‍याच मानवी शासकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. जवळजवळ ३,००० वर्षांपूर्वी राजा शलमोनने असं लिहिलं, “मी फिरून निरीक्षण केले; तो पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्‍यांच्या ठायी बळ आहे.”—उपदेशक ४:१.

आजही परिस्थिती बदललेली नाही. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या, २००९ च्या एका प्रकाशनात सांगितल्याप्रमाणे बहुतेक लोकांना असं वाटतं, की आपल्या समाजात होणाऱ्‍या वाईट गोष्टींमागचं एक मुख्य कारण म्हणजे वाईट शासन आहे.

लवकरच बदल होणार आहे!

आज जगाला चांगल्या शासकांची आणि चांगल्या सरकाराची गरज आहे. आणि अगदी हेच देण्याचं वचन आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला दिलं आहे.

मानवांच्या चांगल्यातल्या चांगल्या सरकारांनासुद्धा माणसांच्या मोठमोठ्या समस्या सोडवता आलेल्या नाहीत

देवाने एक असं राज्य किंवा सरकार स्थापन केलं आहे, जे सर्व मानवी सरकारांची जागा घेईल आणि “ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) याच राज्यासाठी लाखो लोक प्रार्थना करत आले आहेत. (मत्तय ६:९, १०) पण या राज्यात देव स्वतः राज्य करणार नाही. उलट, त्याने एका शासकाला नेमलं आहे. हा शासक आधी एक मानव म्हणून जगला. देवाने निवडलेला हा शासक कोण आहे?