व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पृथ्वी आपला उपज देईल; देव, आपला देव, आपल्याला आशीर्वाद देईल.”—स्तोत्र ६७:६, नवे जग भाषांतर.

भविष्यात देवाकडून मिळणारे आशीर्वाद

भविष्यात देवाकडून मिळणारे आशीर्वाद

देवाने अब्राहाम संदेष्ट्याला असं वचन दिलं होतं, की त्याच्या वंशातून असा एक जण येईल ज्याच्याद्वारे पृथ्वीवरच्या “सर्व” राष्ट्रांना अनेक आशीर्वाद मिळतील. (उत्पत्ति २२:१८) तो कोण असणार होता?

जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी, अब्राहामच्या वंशात येशूचा जन्म झाला. देवाने त्याला अनेक मोठमोठे चमत्कार करण्याची शक्‍ती दिली. त्या चमत्कारांवरून दिसून आलं की देवाने अब्राहामला जे वचन दिलं होतं, ते येशूद्वारे पूर्ण होणार होतं.—गलतीकर ३:१४.

येशूच्या चमत्कारांवरून लोक हे ओळखू शकले, की मानवांना आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला निवडलं आहे. तसंच, भविष्यात मानवांना कायम टिकणारे आशीर्वाद देण्यासाठी देव येशूचा कशा प्रकारे उपयोग करेल, हेही त्याच्या चमत्कारांवरून दिसून आलं. त्या चमत्कारांवरून येशूचे कोणते काही चांगले गुण दिसून येतात ते आता आपण पाहू या.

दयाळूपणा—येशूने अनेक आजारी लोकांना बरं केलं.

एकदा एका कुष्ठरोग्याने येशूला आपल्याला बरं करण्याची विनंती केली. तो म्हणाला: “तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करू शकता?” तेव्हा येशूने त्याला स्पर्श केला आणि म्हटलं, “माझी इच्छा आहे!” आणि त्याच क्षणी त्या माणसाचा कुष्ठरोग नाहीसा झाला.—मार्क १:४०-४२.

उदारता—येशूने हजारो लोकांना जेवू घातलं.

कोणीही उपाशी राहावं अशी येशूची इच्छा नव्हती. म्हणूनच पृथ्वीवर असताना त्याने जवळजवळ दोन वेळा, हजारो लोकांना जेवू घातलं. त्या वेळी शिष्यांनी फक्‍त काही भाकरी आणि काही मासे त्याला आणून दिले. पण मग येशूने चमत्कार करून त्यांचं प्रमाण इतकं वाढवलं, की सगळे लोक पोटभर जेवू शकले. आणि त्यातलं बरंच अन्‍न उरलंसुद्धा.—मत्तय १४:१७-२१; १५:३२-३८.

कनवाळूपणा—पृथ्वीवर असताना येशूने मेलेल्या लोकांना जिवंत केलं.

एकदा एका विधवेच्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्याच्याशिवाय तिची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. तिची ही परिस्थिती पाहून येशूला तिचा खूप कळवळा आला. आणि म्हणून त्याने तिच्या मुलाला जिवंत केलं.—लूक ७:१२-१५.