व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज क्र. ३ २०१८ | देवाला तुमची काळजी आहे का?

देवाला तुमची काळजी आहे का?

जेव्हा विपत्ती येते किंवा खूप त्रास सहन करून लोकांचा मृत्यू होतो तेव्हा आपल्या मनात असे प्रश्‍नं येऊ शकतात: “देवाचं या दुःखांकडे लक्ष आहे का?” किंवा “देवाला आपली काळजी आहे का?” बायबल सांगतं:

“कारण यहोवाचे डोळे नीतिमानांकडे लागलेले असतात आणि तो त्यांच्या याचनेकडे कान लावतो, पण वाईट गोष्टी करणाऱ्‍याकडे यहोवा पाठ फिरवतो.”—१ पेत्र ३:१२.

टेहळणी बुरूज चा हा अंक आपल्याला हे समजायला मदत करेल की देव आपली मदत कशी करत आहे आणि लवकरच तो सर्व दुःख काढून टाकण्यासाठी काय करणार आहे.

 

“त्या वेळी देव कुठे होता?”

एखाद्या भयानक घटनेमुळे तुमच्या मनात कधी असा प्रश्‍न आला आहे का, की देवाला माझी वैयक्‍तिक रीत्या काळजी आहे?

देव तुमच्यावर प्रेमळपणे लक्ष देतो

कोणत्या पुराव्यावरून समजतं की देवाला तुमच्याबद्दल काळजी आहे?

देव तुमच्या भावना समजू शकतो

देवाला आपल्याबद्दल आणि आपल्या आनुवंशिक रचनेबद्दल विलक्षण माहिती आहे. यामुळे आपल्याला खातरी पटते की त्याला आपल्या प्रत्येकाबद्दल बारीकसारीक गोष्ट माहीत आहे आणि तो आपल्याला चांगल्या प्रकारे समजतो.

देवाला आपल्याबद्दल सहानुभूती आहे

देवाचं आपल्यावर लक्ष आहे आणि तो आपल्या भावना समजतो असं बायबल आपल्याला आश्‍वासन देतं.

दुःख—देवाकडून शिक्षा आहे का?

देव लोकांना त्यांच्या पापांसाठी आजारांचा किंवा दुर्घटनांचा उपयोग करून त्यांना शिक्षा करतो का?

आपल्या सर्व दुःखांसाठी कोण जबाबदार आहे?

देवाचं वचन, बायबल आपल्याला मानवांच्या दुःखासाठी जबाबदार असलेली तीन मुख्य कारणं सांगतं.

देव लवकरच सर्व दुःखांचा अंत करेल

देव सर्व दुःखांचा आणि अन्यायाचा अंत करण्यासाठी लवकरच कार्य करणार आहे हे आपल्याला कसं जाणून घेऊ शकतो?

देव आपली काळजी करतो हे जाणल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

एका सुंदर भविष्याबद्दल देवाच्या अभिवचनावर विश्‍वास ठेवायला शास्त्रवचनं आपली मदत करतात.

तुम्ही सहन करत असलेल्या दुःखाबद्दल देवाला काय वाटतं?

ही बायबल वचनं तुम्हाला समजायला मदत करतील की देवाला तुमच्या दुःखाबद्दल काय वाटतं.