व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्‍नांची उत्तरे

बायबल प्रश्‍नांची उत्तरे

देव सगळ्याच प्रार्थना ऐकतो का?

देव सर्व देशांतील लोकांच्या प्रार्थना ऐकतो. (स्तोत्र १४५:१८, १९) त्याचे वचन बायबल, आपल्याला उत्तेजन देते की ज्या गोष्टींची आपल्याला काळजी वाटते त्यांबद्दल आपण त्याच्याशी बोलले पाहिजे. (फिलिप्पैकर ४:६, ७) असे असले तरी, काही प्रार्थना देवाला आवडत नाहीत. जसे की, तोंडपाठ केलेल्या प्रार्थना त्याला आवडत नाही.—मत्तय ६:७ वाचा.

यहोवाला अशा लोकांच्याही प्रार्थना आवडत नाही जे त्याच्या नियमांकडे मुद्दामहून दुर्लक्ष करतात. (नीतिसूत्रे २८:९) उदाहरणार्थ, बायबल लिहिले त्या काळात खुनाच्या आरोपात दोषी असलेल्या इस्राएली लोकांची प्रार्थना देवाने ऐकली नाही. यावरून हे स्पष्ट होते की देवाने आपली प्रार्थना ऐकावी अशी जर आपली इच्छा असेल तर आपण काही अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत.—यशया १:१५ वाचा.

देवाने आपली प्रार्थना ऐकावी असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय केले पाहिजे?

विश्‍वास जर नसेल तर प्रार्थनेद्वारे देवाजवळ जाणे अशक्य आहे. (याकोब १:५, ६) म्हणून, आपल्याला पूर्ण विश्‍वास असला पाहिजे की देव अस्तित्वात आहे आणि त्याला आपली काळजी आहे. आपण बायबलचा अभ्यास करून आपला विश्‍वास बळकट करू शकतो. कारण खरा विश्‍वास, देवाच्या वचनात मिळणारे पुरावे आणि बायबल देत असलेली खातरी यांवर आधारित आहे.—इब्री लोकांस ११:१,  वाचा.

आपण आपली प्रार्थना मनापासून आणि नम्रतेने केली पाहिजे. देवाचा पुत्र, येशू यानेदेखील नम्रतेने प्रार्थना केली. (लूक २२:४१, ४२) तर मग, देवाने काय केले पाहिजे हे त्याला सांगण्याऐवजी आपण बायबलचे वाचन करून त्याच्या काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यास आपल्या प्रार्थना देवाच्या इच्छेनुसार असतील.—१ योहान ५:१४ वाचा. (w१३-E ०८/०१)