व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय नऊ

आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?

आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?
  • आपल्या काळाविषयी बायबलमध्ये कोणत्या घटनांचे भाकीत करण्यात आले होते?

  • ‘शेवटल्या काळात’ लोक कसे असतील असे देवाचे वचन म्हणते?

  • ‘शेवटल्या काळाविषयी’ बायबल कोणत्या चांगल्या गोष्टी सांगते?

१. भविष्याविषयी आपण कोठे शिकू शकतो?

टीव्हीवरील बातम्या ऐकून तुमच्या मनात कधी ‘या जगाचं काय होणार आहे?’ असा प्रश्न आला का? मनाचा थरकाप उडवणाऱ्या घटना इतक्या अचानक आणि अनपेक्षितपणे घडतात, की उद्या काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. (याकोब ४:१४) परंतु भविष्यात काय होणार आहे, हे यहोवाला माहीत आहे. (यशया ४६:१०) फार पूर्वी त्याचे वचन बायबल यात, आपल्या दिवसांत घडणाऱ्या फक्त वाईट गोष्टींचेच नव्हे तर नजीकच्या भविष्यात होणार असलेल्या अद्‌भुत गोष्टींविषयीचे देखील भाकीत करण्यात आले होते.

२, ३. येशूच्या शिष्यांनी त्याला कोणता प्रश्न विचारला, आणि त्याने याचे काय उत्तर दिले?

येशू ख्रिस्त देवाच्या राज्याविषयी बोलला. हे देवाचे राज्य दुष्टाईचा अंत करून पृथ्वीला परादीस बनवेल. (लूक ४:४३) हे राज्य केव्हा येईल हे जाणून घ्यायला लोक उत्सुक होते. येशूच्या शिष्यांनीसुद्धा एकदा त्याला असे विचारले: “आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय २४:३) त्यांना उत्तर देताना येशूने म्हटले, की फक्त यहोवा देवालाच या युगाची समाप्ती नेमकी केव्हा होईल हे माहीत आहे. (मत्तय २४:३६) पण देवाच्या राज्याकरवी मानवजातीला खरी शांती व सुरक्षितता लाभण्याआधी कोणत्या घटना घडतील हे मात्र येशूने त्यांना सांगितले. त्याने ज्याच्याविषयी भाकीत केले होते ते आता पूर्ण होत आहे!

आपण ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात जगत आहोत हे दाखवणाऱ्या पुराव्याचे परीक्षण करण्याआधी, एका युद्धाविषयी माहीत करून घेऊ या, की जे कोणा मानवाने पाहणे शक्य नव्हते. हे युद्ध अदृश्य आत्मिक जगात अर्थात स्वर्गात झाले आणि या युद्धाच्या शेवटाचा आपल्यावर परिणाम होतो.

स्वर्गातील युद्ध

४, ५. (क) येशू स्वर्गात राजा झाल्याबरोबर तेथे काय झाले? (ख) प्रकटीकरण १२:१२ नुसार स्वर्गातील युद्धाचा परिणाम काय होणार होता?

येशू ख्रिस्त १९१४ साली स्वर्गात राजा बनल्याचे स्पष्टीकरण या पुस्तकातील मागच्या अध्यायात देण्यात आले होते. (दानीएल ७:​१३, १४) राज्य सत्ता हाती घेतल्याबरोबर येशूने कार्य केले. बायबल म्हणते: “स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल [येशूचे आणखी एक नाव] व त्याचे दूत अजगराबरोबर [दियाबल सैतान] युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले.” * सैतान आणि त्याच्याबरोबरच्या दुष्ट देवदूतांचा अर्थात दुरात्म्यांचा पराभव करण्यात आला. त्यांना स्वर्गातून हाकलून पृथ्वीवर फेकण्यात आले. सैतान व त्याच्या दुरात्म्यांची स्वर्गातून हकालपट्‌टी झाल्यामुळे देवाच्या विश्वासू आत्मिक पुत्रांनी आनंद केला. पण मानवांना असा आनंद होणार नव्हता. उलट बायबलमध्ये असे भाकीत करण्यात आले: ‘पृथ्वीवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.’​—प्रकटीकरण १२:७, ९, १२.

स्वर्गात झालेल्या युद्धाचा काय परिणाम होणार होता, कृपया याच्याकडे लक्ष द्या. तिळपापड झालेला सैतान पृथ्वीवर राहणाऱ्यांवर अनर्थ किंवा संकट आणणार होता. आपण याच अनर्थाच्या काळात जगत आहोत, हे आपण पुढे पाहणार आहोत. पण या काळाचा अवधी जास्त नसेल. तो फक्त ‘थोडा वेळ’ असेल. सैतानालाही हे माहीत आहे. बायबल या काळाला ‘शेवटला काळ’ म्हणते. (२ तीमथ्य ३:१) देव लवकरच पृथ्वीवरून दियाबलाचा सर्व प्रभाव काढून टाकणार आहे, याबद्दल आपल्याला आनंद होत नाही का? बायबलने भाकीत केलेल्या काही घटनांवर आपण जरा चर्चा करू या, की ज्या आज घडत आहेत. या घटनांवरून हे सिद्ध होते, की आपण शेवटल्या काळात जगत आहोत आणि देवाचे राज्य लवकरच यहोवावर प्रेम करणाऱ्यांना चिरकालिक आशीर्वाद देणार आहे. सर्वप्रथम आपण, त्या चिन्हाच्या चार पैलूंचे परीक्षण करून पाहू या; हेच चिन्ह आपण जगत असलेल्या काळाला सूचित होते, असे येशूने म्हटले होते.

शेवटल्या दिवसांतील प्रमुख घडामोडी

६, ७. युद्धे आणि अन्नटंचाई याबद्दल येशूने केलेली भाकीते आज कशी पूर्ण होत आहेत?

“राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.” (मत्तय २४:७) गेल्या शंभर वर्षांत कोट्यवधी लोक युद्धांत मारले गेले. एका ब्रिटिश इतिहासकाराने लिहिले: “२० वे शतक आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित शतक होते. . . . हे असे शतक होते ज्यात युद्धांची जणू काय मालिकाच सुरू होती. कारण, केवळ काही ठिकाणे सोडून पृथ्वीच्या पाठीवर कुठेतरी नेहमी संघटित सशस्त्र झगडे चालले होते.” वर्ल्डवॉच इन्स्टिट्यूटकडून आलेल्या एका वृत्तान्तात असे म्हटले होते: “इसवी सन पहिल्या शतकापासून १८९९ पर्यंत झालेल्या सर्व युद्धांत जितके लोक बळी पडले त्याच्या तीन पट, एकट्या [२० व्या] शतकात झालेल्या युद्धांत बळी पडले.” १९१४ पासून युद्धांमुळे १०० दशलक्षापेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याचे दुःख आपण अनुभवले असेल; परंतु, ज्यांनी आपल्या प्रिय जनांना गमावले आहे अशा कोट्यवधी लोकांचे दुःख आणि त्यांना होत असलेल्या यातनांची आपण केवळ कल्पना करू शकतो.

“जागोजागी दुष्काळ” होतील. (मत्तय २४:७) संशोधकांचे म्हणणे आहे, की गेल्या ३० वर्षांत अन्नाच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. तरीपण, आज अन्नटंचाई आहेच. कारण पुष्कळ लोकांकडे अन्न विकत घेण्याइतपत पैसे नाहीत किंवा धान्यधुन्य पिकवण्यासाठी जमीन नाही. लक्षावधी लोक उपासमारीचे शिकार होतात. जागतिक आरोग्य संघटनेने असा अंदाज लावला आहे, की दरवर्षी मरण पावणारी पन्नास लाख मुले बहुतेककरून कुपोषणामुळे दगावतात.

८, ९. भूकंप आणि मऱ्या यांविषयी येशूने केलेली भाकीते खरी ठरली आहेत हे कशावरून दिसून येते?

“मोठमोठे भूमिकंप होतील.” (लूक २१:११) यु.एस. जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, केवळ १९९० पासून दर वर्षी होणारे सरासरी १७ भूकंप, इमारतींना तडे जाण्याइतपत व जमीन दुभांगण्याइतपत शक्तिशाली भूकंप होते. आणि सर्वसामान्यपणे, इमारतींना पूर्णपणे जमीनदोस्त करणारे भूकंप दरवर्षी झाले आहेत. आणखी एका वृत्ताकडून अशी माहिती मिळाली, की: “गेल्या १०० वर्षांत भूकंपांनी लाखो लोकांचा बळी घेतला आहे. तंत्रज्ञानातील प्रगतींमुळे मृत्यूच्या प्रमाणात केवळ किंचित घट झाली आहे.”

“जागोजाग मऱ्या येतील.” (लूक २१:११) वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत असूनही, जुन्या व नवीन आजारांनी मानवजातीला जेरीस आणले आहे. एका वृत्तात असे म्हटले होते, की २० सर्वज्ञात आजार​—ज्यांत क्षयरोग, मलेरिया आणि कॉलरा यांचाही समावेश होतो​—अलिकडच्या दशकांत सर्वसामान्य झाले आहेत आणि काही प्रकारचे आजार तर औषधांनी बरे करणे महाकठीण आहे. वास्तविक पाहता, निदान ३० नवीन आजारांचा उद्रेक झाला आहे. यांतील काही आजारांवर तर उपचार माहीत नाही शिवाय ते जीवघेणे देखील आहेत.

शेवटल्या काळचे लोक

१०. दुसरे तीमथ्य ३:​१-५ मध्ये लोकांच्या मनोवृत्तीतील कोणत्या बदलाविषयी भाकीत करण्यात आले आहे जे तुम्हाला आजच्या लोकांत दिसून येते?

१० विशिष्ट जागतिक घडामोडींचे वर्णन देण्याव्यतिरिक्त बायबलमध्ये, मानव समाजात होणारा बदल, शेवटल्या दिवसांचे चिन्ह असेल हेही भाकीत करण्यात आले. लोकांच्या मनोवृत्तीत कसा बदल होईल, हे प्रेषित पौलाने सांगितले. याविषयी आपण २ तीमथ्य ३:​१-५ मध्ये असे वाचतो: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” या वचनात काही ठिकाणी पौलाने लोक कसे होतील ते सांगितले:

  • स्वार्थी

  • धनलोभी

  • आईबापांस न मानणारी

  • उपकार न स्मरणारी

  • ममताहीन

  • असंयमी

  • क्रूर

  • देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी

  • सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी

११. दुष्ट लोकांचे काय होईल असे स्तोत्र ९२:७ सांगते?

११ तुमच्या आसपासचे लोक असेच झाले आहेत का? यात काही वाद नाही, ते असेच झाले आहेत. असे दुर्गुणी लोक आज सर्वत्र आहेत. यावरून दिसून येते, की देव लवकरच कार्य करणार आहे. कारण बायबल म्हणते: “दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच.”​—स्तोत्र ९२:७.

सकारात्मक घडामोडी

१२, १३. ‘अंतसमयात’ कशाप्रकारे “खरे ज्ञान बहुतपट” झाले आहे?

१२ बायबलमध्ये भाकीत केल्याप्रमाणे शेवटले दिवस खरोखरच अनर्थकारी आहेत. पण या त्रस्त जगात यहोवाच्या उपासकांमध्ये सकारात्मक घडामोडी देखील आहेत.

१३ “खरे ज्ञान बहुतपट होईल,” असे बायबलमधील दानीएलाच्या पुस्तकात भाकीत करण्यात आले होते. हे केव्हा होईल? ‘अंतसमयात.’ (दानीएल १२:​४, पं.र.भा.) खासकरून, १९१४ पासून यहोवाने अशा लोकांना मदत केली आहे की ज्यांना त्याची सेवा करण्याची मनापासून इच्छा आहे. त्याने त्यांना, बायबलच्या ज्ञानात वृद्धी करण्याकरता मदत केली. अशा लोकांना देवाचे नाव आणि त्याचा उद्देश, येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान, मृतांची स्थिती आणि पुनरुत्थान या मौल्यवान सत्यांची अधिक समज प्राप्त झाली आहे. शिवाय यहोवाच्या उपासकांनी, स्वतःला हितकारक ठरेल आणि देवाचे गौरव होईल असे जीवन कसे जगता येईल हेही शिकून घेतले आहे. त्यांना देव राज्याच्या भूमिकेची आणि हे राज्य पृथ्वीवरील परिस्थिती कशाप्रकारे सुधारेल याबद्दलची स्पष्ट समज मिळाली आहे. हे ज्ञान मिळाल्यावर ते काय करतात? हा प्रश्न आणखी एका भविष्यवाणीकडे आपले लक्ष वळवतो जी या शेवटल्या काळात पूर्ण होत आहे.

“राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.”​—मत्तय २४:१४

१४. आज राज्याच्या सुवार्तेचा प्रचार किती विस्तृत प्रमाणात होत आहे, व कोण हा प्रचार करत आहेत?

१४ “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल,” असे “युगाच्या समाप्तीचे” भाकीत करताना येशूने म्हटले. (मत्तय २४:३, १४) संपूर्ण पृथ्वीवर राज्याच्या सुवार्तेचा प्रचार अर्थात ते राज्य काय आहे, ते काय करणार आहे, आपण त्याचे आशीर्वाद कसे मिळवू शकतो याविषयी २३० पेक्षा अधिक राष्ट्रांत आणि ४०० पेक्षा अधिक भाषांत होत आहे. लाखो यहोवाचे साक्षीदार राज्य सुवार्तेचा आवेशाने प्रचार करत आहेत. हे यहोवाचे साक्षीदार ‘सर्व राषट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यातून’ आलेले आहेत. (प्रकटीकरण ७:९) साक्षीदार अशा लाखो लोकांबरोबर बायबलचा अभ्यास करत आहेत की ज्यांना बायबल नेमके काय शिकवते हे जाणून घ्यायची इच्छा आहे. बायबल भविष्यवाणीची किती ही प्रभावी पूर्णता आहे; येशूने असेही भाकीत केले होते की खऱ्या ख्रिश्चनांचा ‘सर्व द्वेष करतील,’ तरीपण सुवार्तेविषयी जे भाकीत करण्यात आले होते ते पूर्ण होत आहे हे उल्लेखनीय आहे.​—लूक २१:१७.

तुम्ही काय कराल?

१५. (क) आपण शेवटल्या काळात जगत आहोत, हे तुम्हाला मान्य आहे का, व तुम्ही का मान्य करता? (ख) यहोवाचा विरोध करणाऱ्यांसाठी आणि देव राज्याच्या शासनाच्या अधीन होणाऱ्यांसाठी “शेवट” याचा काय अर्थ असेल?

१५ आज बायबलच्या बऱ्याच भविष्यवाणींची पूर्णता होत असताना, आपण शेवटल्या काळात जगत आहोत, याबरोबर तुम्ही सहमत नाही का? यहोवाचे समाधान होईपर्यंत सुवार्तेचा प्रचार झाल्यानंतर “शेवट” नक्की येईल. (मत्तय २४:१४) “शेवट” म्हणजे देव पृथ्वीवरून दुष्ट लोकांचे उच्चाटन करील तो काळ. यहोवाच्या विरोधात उभे राहण्यास आपखुशीने निवड करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी तो, येशू आणि शक्तिशाली देवदूतांचा उपयोग करेल. (२ थेस्सलनीकाकर १:​६-९) सैतान आणि त्याचे दुरात्मे त्यानंतर राष्ट्रांची फसवणूक करणार नाहीत. मग देवाचे राज्य, जे त्याच्या धार्मिक शासनाच्या अधीन होतात त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करील.​—प्रकटीकरण २०:​१-३; २१:​३-५.

१६. तुम्ही कोणते सुज्ञ कार्य करू शकता?

१६ सैतानी व्यवस्थेचा अंत जवळ आल्यामुळे आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे: ‘मी काय केले पाहिजे?’ यहोवाबद्दल आणि आपल्याकडून तो काय अपेक्षितो याबद्दल आपण अधिक ज्ञान घेत राहणे सुज्ञपणाचे आहे. (योहान १७:३) बायबलचा मनःपूर्वक अभ्यास करा. यहोवाची इच्छा करू पाहणाऱ्यांबरोबर नियमितरीत्या संगती करण्याची स्वतःला सवय लावा. (इब्री लोकांस १०:​२४, २५) संपूर्ण जगभरातील लोकांसाठी यहोवा देवाने उपलब्ध करून दिलेले ज्ञान घ्या आणि आपल्या जीवनात बदल करा. यामुळे तुम्ही देवाची मर्जी प्राप्त करू शकाल.​—याकोब ४:८.

१७. दुष्टांवर जो नाश येणार आहे त्यामुळे बहुतेक लोक गोंधळात का पडतील?

१७ आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत या पुराव्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतील, असे येशूने भाकीत केले होते. दुष्टांचा नाश अचानक, कुणाच्या ध्यानीमनी नसताना येईल. चोर रात्रीचा अचानक आल्यावर लोक कसे गोंधळून जातात, तसा शेवट अचानक येईल तेव्हा बहुतेक लोक आश्चर्यचकित होतील. (१ थेस्सलनीकाकर ५:२) येशूने बजावले: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही [“त्यांनी दखल घेतली नाही,” NW]; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.”​—मत्तय २४:३७-३९.

१८. येशूने दिलेल्या कोणत्या इशाऱ्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे?

१८ म्हणूनच येशूने आपल्या श्रोत्यांना सांगितले: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर [स्वीकृतीसह] उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.” (लूक २१:३४-३६) येशूच्या शब्दांकडे लक्ष देण्यात सुज्ञपणा आहे. का? कारण यहोवा देवाची आणि ‘मनुष्याचा पुत्र’ अर्थात येशू ख्रिस्त याची मर्जी मिळालेल्यांना सैतानी व्यवस्थीकरणाच्या अंतातून बचावण्याची आशा आहे. तसेच अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या अद्‌भुत नवीन जगात चिरकाल जगण्याची देखील आशा आहे.​—योहान ३:१६; २ पेत्र ३:१३.

^ परि. 4 मीखाएल हे येशू ख्रिस्ताचे आणखी एक नाव आहे, याबद्दल अधिक माहितीसाठी पृष्ठे २१८-१९ वरील परिशिष्ट पाहा.