व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय सोळा

खऱ्या उपासनेची बाजू घ्या

खऱ्या उपासनेची बाजू घ्या
  • मूर्तींचा उपयोग करण्याविषयी बायबलची काय शिकवण आहे?

  • ख्रिश्चनांचा धार्मिक सणावारांच्या बाबतीत कोणता दृष्टिकोन आहे?

  • इतरांचे मन न दुखावता तुम्ही त्यांना तुमच्या विश्वासांबद्दल कसे सांगू शकता?

१, २. खोटा धर्म सोडून दिल्यानंतर तुम्ही स्वतःला कोणता प्रश्न विचारला पाहिजे, आणि असे करणे अगत्याचे का आहे असे तुम्हाला वाटते?

समजा, तुमच्या पाण्याच्या टाकीत कोणीतरी गुपचूप विष घातले आहे व यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. अशावेळी तुम्ही काय कराल? तुम्ही लगेच पिण्यास सुरक्षित असलेले पाणी मिळवायचा प्रयत्न कराल. पण असे केल्यानंतरही तुमच्या मनात सतत एक प्रश्न घोंघावत राहील, ‘मला विषबाधा तर झाली नसेल?’

खोट्या धर्माच्या बाबतीतही अशीच एक परिस्थिती उद्‌भवली आहे. अशाप्रकारची उपासना अशुद्ध शिकवणुकी आणि प्रथांनी दूषित झाली आहे. (२ करिंथकर ६:१७) म्हणूनच तर तुम्ही खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य अर्थात “मोठी बाबेल” हिच्यामधून बाहेर निघणे अगत्याचे आहे. (प्रकटीकरण १८:​२, ४) तुम्ही असे केले आहे का? जर केले असेल, तर हे प्रशंसनीय आहे. पण खोट्या धर्मापासून फक्त स्वतःला वेगळे करणे पुरेसे नाही. तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे: ‘खोट्या धर्माचा कोणताही मागमूस माझ्यात अजूनही आहे का?’ काही उदाहरणांचा विचार करा.

मूर्ती आणि पूर्वजांची उपासना

३. (क) मूर्तींचा उपयोग करण्याविषयी बायबल काय म्हणते, आणि काहींना देवाचा दृष्टिकोन स्वीकारणे कठीण का वाटू शकते? (ख) खोट्या उपासनेशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट तुमच्याजवळ असल्यास तुम्ही काय केले पाहिजे?

काहींनी आपल्या घरातच अनेक वर्षांपासून मूर्ती ठेवल्या आहेत किंवा देव्हारे बनवली आहेत. तुमच्याही घरात मूर्ती किंवा देव्हारा आहे का? असल्यास, तुम्हाला एखाद्या दृश्य मूर्तीविना देवाला प्रार्थना करणे विचित्र किंवा चुकीचे वाटत असेल. तुम्हाला कदाचित या गोष्टी फार प्रियही वाटत असतील. पण देवाची उपासना कशी केली पाहिजे हे स्वतः देव आपल्याला सांगतो आणि बायबल आपल्याला शिकवते, की आपण मूर्तींचा उपयोग करू नये, अशी देवाची इच्छा आहे. (निर्गम २०:​४, ५; स्तोत्र ११५:​४-८; यशया ४२:८; १ योहान ५:२१) तेव्हा, तुमच्याजवळ खोट्या उपासनेशी संबंधित असलेली कोणतीही वस्तू असल्यास, ती नष्ट करून तुम्ही खऱ्या उपासनेची बाजू घेऊ शकता. या गोष्टी यहोवाला ‘वीट आणणाऱ्या’ आहेत; असाच दृष्टिकोन तुम्हीही बाळगा.​—अनुवाद २७:१५.

४. (क) पूर्वजांची उपासना व्यर्थ आहे हे आपल्याला कसे समजते? (ख) कोणत्याही प्रकारची भुताटकी करण्यास यहोवाने आपल्या लोकांना मनाई का केली?

अनेक खोट्या धर्मात, पूर्वजांची उपासना देखील केली जाते. बायबलमधील सत्य शिकण्याआधी पुष्कळांचा असा विश्वास होता, की मृत जन एका अदृश्य जगात असतात आणि ते जिवंत असलेल्यांना मदत करू शकतात किंवा त्यांना त्रास देऊ शकतात. तुमच्या मृत पूर्वजांना शांत करण्यासाठी तुम्ही कदाचित पुष्कळ प्रयत्न करत होता. पण या पुस्तकाच्या सहाव्या अध्यायात तुम्ही शिकल्याप्रमाणे, मृत जन कोठेही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर दळणवळण राखण्याचे प्रयत्न हे व्यर्थ आहेत. एखाद्या मृत प्रिय व्यक्तीकडून संदेश आला आहे, असे जे आपल्याला भासवले जाते ते खरे तर दुरात्म्यांकडून असते. यास्तव, यहोवाने इस्राएल लोकांना मृतांबरोबर कसल्याही प्रकारचे दळणवळण राखण्याची किंवा कोणत्याही प्रकारची भुताटकी करण्यास मनाई केली होती.​—अनुवाद १८:​१०-१२.

५. पूर्वी तुम्ही मूर्तींचा उपयोग करत असाल किंवा पूर्वजांची उपासना करत असाल तर आता तुम्ही काय करू शकता?

पूर्वी तुम्ही उपासनेत मूर्तींचा उपयोग करत असाल किंवा पूर्वजांची उपासना करत असाल तर आता तुम्ही काय करू शकता? या गोष्टींबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे हे दाखवणारे बायबलमधील उतारे वाचा आणि त्यांवर मनन करा. खऱ्या उपासनेची बाजू घेण्याची तुमची इच्छा आहे, अशी यहोवाला दररोज प्रार्थना करा आणि त्याच्याप्रमाणे विचार करायला तुम्हाला मदत करण्यास विनंती करा.​—यशया ५५:९.

नाताळ​—आरंभीच्या ख्रिश्चनांनी साजरा केला नाही

६, ७. (क) नाताळ का साजरा केला जातो, आणि येशूच्या पहिल्या शतकातील अनुयायांनी तो साजरा केला का? (ख) येशूचे शिष्य हयात होते तेव्हा वाढदिवसांचा संबंध कशाची लावला जायचा?

एखाद्या व्यक्तीची उपासना, लोकप्रिय सणावारांच्या बाबतीतही खोट्या धर्मामुळे दूषित होऊ शकते. नाताळाचेच उदाहरण घ्या. नाताळाच्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा केला जातो आणि ख्रिस्ती असल्याचा दावा करणारा जवळजवळ प्रत्येक धर्म हा सण साजरा करतो. पण, पहिल्या शतकातील येशूच्या अनुयायांनी हा सण साजरा केल्याचा कोणताही पुरावा नाही. गहन गोष्टींचा पवित्र उगम (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “ख्रिस्ताचा जन्म होऊन दोनशे वर्ष उलटली होती तरीपण, कोणालाही त्याच्या जन्मतारखेची माहिती नव्हती; आणि फार कमी लोकांना, ती तारीख कोणती होती हे जाणून घ्यायचे होते.”

येशूच्या शिष्यांना त्याची जन्मतारीख माहीत असती तरी त्यांनी तो दिवस साजरा केला नसता. का नसता? कारण, वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआनुसार, आरंभीचे ख्रिस्ती, “कोणाचाही जन्मदिवस साजरा करणे मूर्तीपूजक रीतीरिवाज आहे, असे मानत.” बायबलमध्ये ज्या वाढदिवसांचा उल्लेख केला आहे तो अशा दोन राजांनी साजरा केला होता जे यहोवाचे उपासक नव्हते. (उत्पत्ति ४०:२०; मार्क ६:२१) वाढदिवस, हे खोट्या दैवतांच्या प्रीत्यर्थ देखील साजरे केले जात असत. उदाहरणार्थ, २४ मे रोजी, रोमी लोक डायना या देवीचा वाढदिवस साजरा करीत. दुसऱ्या दिवशी, ते अपोलो या सूर्यदेवाचा वाढदिवस साजरा करीत. त्यामुळे, वाढदिवसांचा संबंध ख्रिस्ती धर्माशी नव्हे तर मूर्तीपूजेशी होता.

८. वाढदिवस आणि अंधविश्वास यांत काय संबंध आहे ते समजावून सांगा.

पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी येशूचा वाढदिवस का साजरा केला नाही यामागे आणखी एक कारण आहे. त्याच्या शिष्यांना माहीत होते, की वाढदिवस साजरा करण्याचा अंधविश्वासांशी संबंध आहे. जसे की, प्राचीन काळच्या पुष्कळ ग्रीक आणि रोमी लोकांचा असा विश्वास होता, की प्रत्येक मानवाचा जन्म होतो तेव्हा एक आत्मा तेथे हजर असतो व तो आत्मा त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यभर सांभाळतो. “त्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी ज्या दैवताचा वाढदिवस असेल त्या दैवताशी या आत्म्याचा चमत्कारिक संबंध असतो,” असे वाढदिवसांची परंपरा (इंग्रजी) नावाचे पुस्तक म्हणते. येशूचा अंधविश्वासाशी संबंध लावणारा कोणताही सण यहोवाला नक्कीच आवडणार नाही. (यशया ६५:​११, १२) मग, नाताळ सण इतके लोक कसा काय साजरा करू लागले?

नाताळाचा उगम

९. डिसेंबर २५ ही तारीख, येशूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कशी काय निवडण्यात आली?

येशू या पृथ्वीवर राहून गेल्याच्या शेकडो वर्षांनंतर लोक २५ डिसेंबर या तारखेला त्याचा वाढदिवस म्हणून साजरा करू लागले. पण ही येशूची जन्मतारीख नाही. कारण पुराव्यानुसार त्याचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला होता. * मग २५ डिसेंबर हा दिवस का निवडण्यात आला? “मूर्तीपूजक रोमी सण अर्थात ‘अजिंक्य सूर्याचा वाढदिवस’ आणि येशूचा वाढदिवस एकाच दिवशी करावासा वाटला” म्हणून, ख्रिस्ती असल्याचा नंतर दावा करणाऱ्यांनी ही तारीख निवडली. (द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका) या लोकांचा असा विश्वास होता, की हिवाळ्यात सूर्याची शक्ती कमी होते त्यामुळे दूर प्रवासाला गेलेल्या सूर्याने पुन्हा येऊन त्यांना ऊब व प्रकाश द्यावा म्हणून हा सण साजरा केला जाई. डिसेंबर २५ रोजी सूर्य हा परतीचा प्रवास सुरु करायचा, असे मानले जात. मूर्तीपूजक लोकांचे धर्मांतर करण्याकरता, धार्मिक नेत्यांनी हा सण स्वीकारला आणि त्याला “ख्रिस्ती” रूप देण्याचा प्रयत्न केला. *

१०. गत काळात काही लोक नाताळ का साजरा करीत नव्हते?

१० नाताळाचा उगम मूर्तिपूजक प्रथांमधून आहे हे केव्हाच ओळखण्यात आले होते. हा सण बायबलनुसार नसल्यामुळे, सतराव्या शतकादरम्यान, इंग्लंडमध्ये आणि काही अमेरिकन वसाहतींमध्ये नाताळ साजरा करण्याला बंदी होती. नाताळाच्या दिवशी जो कोणी कामाला जात नसे त्याला दंड भरावा लागायचा. परंतु, हे जास्त दिवस चालले नाही. जुन्या प्रथा पुन्हा प्रचलित झाल्या आणि काही नवीन प्रथांची देखील भर पडली. नाताळ पुन्हा एकदा लोकप्रिय सण झाला. त्यामुळे आज अनेक देशांत तो पाळला जातो. परंतु नाताळाचा संबंध खोट्या धर्माशी असल्यामुळे, जे देवाला संतुष्ट करू इच्छितात ते नाताळ किंवा खोट्या उपासनेतून निघालेला कोणताही सण साजरा करीत नाहीत. *

पण सणांचा उगम कोठून होतो हे महत्त्वाचे आहे का?

११. काही लोक सण का साजरा करतात, पण आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे?

११ नाताळ सारख्या सणांचा उगम मूर्तीपूजक प्रथांमधून झाला आहे, हे काहींना पटत असले तरीसुद्धा त्यांना वाटते, की हे सण पाळण्यात काही गैर नाही. कारण, सण साजरा करत असताना बहुतेक लोक खोट्या उपासनेचा विचार करत नाहीत. सणांच्या निमित्ताने, कुटुंबांना एकत्र येण्याची संधी मिळते, असे त्यांना वाटते. तुम्हालाही असेच वाटते का? जर वाटते तर खोट्या धर्माबद्दलचे प्रेम नव्हे तर कुटुंबाबद्दलच्या प्रेमामुळे तुम्हाला, खऱ्या उपासनेची बाजू घेण्यास जड जात आहे. ही खात्री बाळगा, की ज्याने कुटुंबाची सुरुवात केली त्या यहोवाची इच्छा आहे, की तुमचा तुमच्या नातेवाईकांबरोबर चांगला संबंध असावा. (इफिसकर ३:​१४, १५) पण हा संबंध तुम्ही देव मान्य करतो त्या पद्धतीने मजबूत करू शकता. आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे याबाबतीत प्रेषित पौलाने असे लिहिले: “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा.”​—इफिसकर ५:१०.

गटारीतून उचलेले चॉकलेट तुम्ही खाल का?

१२. अशुद्ध उगम असलेल्या प्रथा व सण आपण का टाळले पाहिजेत हे उदाहरण देऊन सांगा.

१२ तुम्हाला कदाचित वाटेल, की सणांचा उगम इतका महत्त्वपूर्ण नाही. पण ते खरोखरच महत्त्वाचे आहे का? होय. समजा: तुम्ही गटारीत एक चॉकेलट पडलेले पाहता. तुम्ही ते उचलून खाल का? मुळीच नाही! ते चॉकलेट घाणीत आहे. त्या चॉकलेट प्रमाणे सण देखील गोड असतील परंतु त्यांना एका अशुद्ध ठिकाणाहून उचलून घेण्यात आले आहे. खऱ्या उपासनेची बाजू घेण्याकरता आपला दृष्टिकोन संदेष्टा यशयासारखा असला पाहिजे. यशयाने खऱ्या उपासकांना सांगितले: “अशुद्ध वस्तुला शिवू नका.”​—यशया ५२:११.

इतरांबरोबर व्यवहार करताना समंजसपणा दाखवा

१३. सण साजरा न केल्यामुळे कोणकोणत्या समस्या उद्‌भवू शकतात?

१३ सण साजरा न करण्याचा तुम्ही निर्णय घेता तेव्हा समस्या उद्‌भवू शकतात. जसे की, तुम्ही जिथे काम करता तेथे, तुम्ही विशिष्ट सण का साजरा करत नाही हे तुमच्या सहकर्मींना समजणार नाही. समजा तुम्हाला कोणी नाताळाची भेटवस्तू दिली, तर तुम्ही काय कराल? ती स्वीकारणे गैर आहे का? तुमच्या लग्नाच्या सोबत्याचे तुमच्यासारखे विश्वास नसतील तर? सण साजरा करत नसल्यामुळे, आपण काहीतरी गमावत आहोत अशी भावना तुमच्या मुलांच्या मनात येणार नाही याची खात्री तुम्ही कशी करू शकता?

१४, १५. तुम्हाला कोणी सणाच्या शुभेच्छा देतो किंवा भेटवस्तू देऊ इच्छितो तेव्हा तुम्ही काय करू शकता?

१४ प्रत्येक परिस्थिती कशी हाताळायची हे समजून घेण्यासाठी समंजसपणाची गरज आहे. तुम्हाला जेव्हा सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा तुम्ही त्यांचे आदरपूर्वक आभार मानू शकता. पण समजा रोजच तुमचा जिच्याशी संबंध येतो, तुम्ही जिला पाहता, किंवा जिच्याबरोबर काम करता त्या व्यक्तीने तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर तुम्ही फक्तच आभारी आहे असे बोलून शांत बसणार नाही. तुम्ही कदाचित तिला याविषयी आणखी सांगाल. अशावेळी व्यवहारचातुर्याचा उपयोग करा. बायबल म्हणते: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” (कलस्सैकर ४:६) तुम्ही इतरांचा अनादर करणार नाही, याची खबरदारी बाळगा. व्यवहारचातुर्याचा उपयोग करून त्यांना समजावून सांगा. भेट-वस्तू देण्याला किंवा एकत्र येण्याला तुमचा विरोध नाही पण तुम्ही दुसऱ्या वेळेला हे सर्व करू इच्छिता, हे स्पष्टपणे सांगा.

१५ तुम्हाला कोणी भेटवस्तू देऊ इच्छित असेल तर? हे परिस्थितीवर अवलंबून आहे. भेटवस्तू देणारी व्यक्ती म्हणेल: “तुम्ही सण साजरा करत नाही हे मला माहीत आहे. तरीपण मला तुम्हाला हे द्यायचं आहे.” अशावेळी तुम्हाला वाटेल, की ती भेटवस्तू स्वीकारणे, सणांत भाग घेतल्यासारखे नाही. अर्थात, भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीला तुमच्या विश्वासांविषयी माहीत नसेल तर तुम्ही तिला सांगू शकता, की तुम्ही सण साजरा करीत नाही. यामुळे तुम्हाला, तुम्ही भेटवस्तू का स्वीकारत आहात व त्याप्रसंगी तुम्ही भेटवस्तू का देत नाही त्याचे कारण समजावून सांगायला सोपे जाईल. दुसरीकडे पाहता, तुम्ही तुमच्या विश्वासांचे पालन करीत नाही किंवा भेटवस्तू मिळण्यासाठी तुम्ही हातमिळवणी करीत आहात, हे दाखवण्याच्या उद्देशाने जर तुम्हाला भेटवस्तू दिली जात आहे तर ती न स्वीकारणे सुज्ञपणा आहे.

कुटुंबातील सदस्यांविषयी काय?

१६. सणांशी संबंधित असलेली कार्ये करताना तुम्ही व्यवहारचातुर्याचा उपयोग कसा करू शकता?

१६ तुमच्या कुटुंबातील सदस्य सत्यात नसतील तर? अशावेळी देखील व्यवहारचातुर्याचा उपयोग करा. तुमचे नातेवाईक जो जो सण साजरा करतील त्या प्रत्येक वेळी तुम्हाला त्यांच्याशी वाद घालायची गरज नाही. त्याऐवजी, त्यांनी जसे तुमच्या विश्वासांचा आदर करावा अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही देखील त्यांच्या मतांचा आदर करा. (मत्तय ७:१२) असे कोणतेही कार्य करण्याचे टाळा की ज्यामुळे तुम्ही सणात भाग घेणाऱ्यांपैकी आहात असे वाटेल. पण, ज्या गोष्टींचा प्रत्यक्ष सणाशी काही संबंध येत नाही अशा गोष्टी करण्याबाबत वाजवी असा. अर्थात, तुम्ही नेहमी असे वागले पाहिजे ज्यामुळे तुमचा विवेक नेहमी शुद्ध राहील.​—१ तीमथ्य १:​१८, १९.

१७. इतर जणांना सण साजरा करत असताना पाहून, आपण काहीतरी गमावत आहोत अशी भावना आपल्या मुलांच्या मनात येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?

१७ शास्त्रवचनांनुसार नसलेले सण साजरे करत नसल्यामुळे आपण काहीतरी गमावत आहोत अशी भावना आपल्या मुलांच्या मनात येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता? वर्षांतील इतर वेळी तुम्ही आपल्या मुलांसाठी काय करता यावर सर्व अवलंबून आहे. काही पालक आपल्या मुलांना अधूनमधून भेटवस्तू देत राहतात. तुमचा वेळ आणि तुमची प्रेमळ काळजी ही तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये उत्तम आहे.

खऱ्या उपासनेचे आचरण करा

खरी उपासना आचरल्याने खरा आनंद मिळतो

१८. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्यामुळे तुम्हाला खऱ्या उपासनेची बाजू घेण्यास मदत कशी मिळू शकेल?

१८ देवाला संतुष्ट करण्याकरता तुम्ही खोटी उपासना सोडून खऱ्या उपासनेची बाजू घेतली पाहिजे. यात काय काय गोवलेले आहे? बायबल म्हणते: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) ख्रिस्ती सभा या, देवाला मान्य असलेल्या पद्धतीने त्याची उपासना करण्याचे आनंदी प्रसंग आहेत. (स्तोत्र २२:२२; १२२:१) या सभांमध्ये विश्वासू ख्रिश्चन ‘उभयतांस उत्तेजन’ देतात.​—रोमकर १:१२.

१९. बायबलमधून तुम्ही ज्या गोष्टी शिकलात त्यांच्याविषयी इतरांना सांगणे का महत्त्वाचे आहे?

१९ खऱ्या उपासनेची बाजू घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी शिकलात त्या इतरांना सांगणे. आज संपूर्ण जगभरात चाललेल्या दुष्टाईमुळे “उसासे टाकून विलाप” करणारे खरोखरच पुष्कळ लोक आहेत. (यहेज्केल ९:४) तुम्ही कदाचित अशा काही लोकांना ओळखतही असाल. भवितव्यासाठी बायबलमध्ये जी आशा दिली आहे ती त्यांना तुम्ही सांगू शकता, हो ना? खऱ्या ख्रिश्चनांबरोबर संगती केल्याने व बायबलमध्ये तुम्ही जी अद्‌भुत सत्ये शिकला आहात त्यांच्याबद्दल इतरांना सांगितल्याने, खोट्या उपासनेशी निगडीत असलेले रीतिरीवाज अनुसरण्याबद्दल तुमच्या मनातील उरली-सुरली इच्छा हळूहळू नाहीशी होईल. खऱ्या उपासनेची बाजू घेतल्यास तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि अनेक आशीर्वाद प्राप्त कराल.​—मलाखी ३:१०.

^ परि. 9 डिसेंबर २५ तारीख निवडण्यामागे, शनिचा उत्सव देखील मुख्य कारण होते. डिसेंबर १७-२४ रोजी रोमी लोक आपल्या कृषीदैवताप्रीत्यर्थ हा सण साजरा करत असत. या सणाच्या दिवसांत, मेजवान्या, आनंदोत्सव, भेट-वस्तू देणे चालायचे.

^ परि. 10 खऱ्या ख्रिश्चनांचा लोकप्रिय सणांविषयी काय दृष्टिकोन आहे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर २२३ पृष्ठांवरील परिशिष्ट पाहा.